
Summary
1️⃣ मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ संघटना व मित्रमंडळ स्थापन झाले आहे.
2️⃣ सोशल मीडियावर आर्थिक मदतीचं आवाहन करत QR कोड आणि पेमेंट नंबरसह पोस्टर व्हायरल झाले.
3️⃣ व्हायरल बॅनरवर भगवानबाबा, नामदेवशास्त्री, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो झळकले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे पोस्टर काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात झळकले असतानाचा आता आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाल्मिक कराडसाठच्या नावाने आता संघटना आणि मित्रमंडळ स्थापन झाले असून चक्क कराडच्या आर्थिक मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.