Vidhan Sabha 2019 : वंचितचाही ठरला फॉर्म्युला; एमआयएम लढणार एवढ्या जागा

तात्या लांडगे
रविवार, 1 सप्टेंबर 2019

- वंचित बहूजन आघाडी अन्‌ एमआयएमच ठरलं 
- युतीनंतर नाराज होणार वंचितचे शिलेदार
- 30 जागा एमआयएम लढणार 

 

सोलापूर : पुण्यात नुकतीच पार पडलेल्या बैठकीत एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असोद्दीन औवेसी आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाचा तिढा सोडविला आहे. एमआयएमने 50 जागांची मागणी केली होती मात्र, हा तिढा 30 जागांवर मिटविण्यात आल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ऑगस्ट अखेर वंचितच्या प्रसिध्द होणारी उमेदवारांच्या पहिल्या यादीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे शिवसेना- भाजप युतीनंतर दोन्ही पक्षातील नाराज इच्छूक वंचित आघाडीचे शिलेदार दिसतील, अशीही चर्चा आहे. 

भाजपच्या मेगाभरतीत केवळ 'या' तीनच नेत्यांचा प्रवेश

भाजप- शिवसेना युती होण्याच्या दृष्टीने आता युध्दपातळीवर हालचाली सुरु आहेत. शिवसेनेला राज्यात 90 हून अधिक जागांबाबत विश्‍वास आहे परंतु, युतीच्या माध्यमातून ते शक्‍य होईल, असा सूर शिवसेनेच्या गोटातून निघू लागला आहे. स्वबळावर लढल्याचा फायदा वंचित बहूजन आघाडीला होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

शिवसेना- भाजप युतीनंतर दोन्ही पक्षातील नाराज झालेले इच्छूक पदाधिकारी वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढतील, असा अंदाज आहे. त्यामुळे शिवसेनेने इच्छूकांची नाराजी दूर करण्याचेही प्रयत्न सुरु केले असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठका घेण्याचेही नियोजन केल्याची चर्चा आहे. 

स्वबळाची शिवसेनेला भिती 
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुप्त लाट अन्‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बोलबाला, या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नुकतेच केलेल्या वक्‍तव्याची (वंचित बहूजन आघाडीचा आगामी काळात विरोधी पक्षनेता होईल) धास्ती घेत आता युती करण्यासाठी शिवसेनेकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

भाजप सोडून उदयनराजे करणार 'या' पक्षात प्रवेश; चर्चांना उधाण

शिवसेना स्वबळावर लढल्यास त्याचा मोठा फायदा वंचित बहूजन आघाडीलाच होईल, असाही अंदाज शिवसेनेच्या गोटातून व्यक्‍त करण्यात येत आहे. तर स्वबळावर लढण्याच्या निर्णयावरुन अनेकांनी नाराजी व्यक्‍त केल्याने आता युतीच्या दृष्टीने शिवसेनेचे पाऊल पडत असल्याचीही चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanchit Aghadi also set formula for vidhansabha