Vande Bharat Express
esakal
मुंबई : पावसाळी वेळापत्रकाच्या नावाखाली मुंबई-गोवा मार्गावरील प्रमुख गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे आठवड्यातील सहा दिवस सुरू ठेवावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. तसेच, वंदे भारतसाठी २० डब्यांच्या दोन स्वतंत्र रेक उपलब्ध करून प्रवासी क्षमता वाढविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.