Lord Buddha : बौद्ध धम्मांत वर्षावासाला आध्यात्मिक मोठं महत्त्व; तथागतांच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या!

जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा (Ashadha Purnima) आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो.
Guru Purnima Ashadha Purnima
Guru Purnima Ashadha Purnimaesakal
Summary

वर्षावास ही बुद्धकाळापासून चालत आलेली परंपरा आहे.

छत्रपती संभाजीनगर : जगात गुरुपौर्णिमा अर्थात आषाढी पौर्णिमा (Ashadha Purnima) आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते.

या काळात उपोसथ विधी ‘अशुद्ध मनाची शुद्धता’ करण्याचा हा काळ आहे. बौद्ध धम्मामध्ये (Buddhism) गुरुपौर्णिमा (Guru Purnima) अर्थात आषाढ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी तथागतांच्या जीवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे. त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली.

Guru Purnima Ashadha Purnima
Ratnagiri Forts : पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यांवर धुडगूस; गडांचं पावित्र्य न राखता मुला-मुलींची हुल्लडबाजी

दुसरी घटना म्हणजे भगवंतांनी सारनाथ या ठिकाणी पहिले धम्मचक्र प्रवर्तन करून आपल्या पाच शिष्यांना प्रथम धम्मोपदेश दिला. त्यामुळे या शिष्यानी भगवंताला आपले गुरू मानले. म्हणून ही आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तिसरी घटना म्हणजेच याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली. गुरुपौर्णिमेपासून तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते.

Guru Purnima Ashadha Purnima
पूजेसाठी वापरला जाणारा 'कापूर' कशापासून तयार केला जातो? काय आहेत फायदे, झाड का होतंय दुर्मिळ; जाणून घ्या..

वर्षावास म्हणजे काय?

वर्षावास ही बुद्धकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजेच पावसाळ्याच्या तीन महिने भिक्खूंना पावसापासून त्रास होऊ नये, त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा, अशी परंपरा आहे.

Guru Purnima Ashadha Purnima
Karnataka : लिंबू हातात घेणाऱ्या आमदाराच्या हातात नारळ कसा? मुख्यमंत्र्यांचा सवाल अन् सभागृहात एकच..

बुद्धविहारात धम्मग्रंथाचे वाचन

पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात प्रत्येक बुद्धविहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन करण्यात येते. त्याचप्रमाणे विपश्यना (ध्यानसाधना), त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना, उपोसथ विधी आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात.

वर्षावासाच्या दरम्यान पूजनीय भिक्खू संघाला घरोघरी भोजनदानासाठी आमंत्रित केले जाते. त्यानंतर त्यादिवशी घरी सामुदायिक ध्यानसाधना, परित्राणपाठ व धम्मदेसना आयोजित करून आपल्या नातेवाइकांना व मित्र परिवार व शेजारी सर्वांना धम्म श्रवण करण्यासाठी निमंत्रित केले जाते.

  • बुद्ध आणि त्यांचा धर्म ग्रंथाचे वाचन

  • विहारांमध्ये तीन महिने भिक्खूंचे अधिष्ठान

  • मनाच्या शुद्धतेसह मैत्रिधर्म निभावण्याचा काळ

Guru Purnima Ashadha Purnima
राजकारणात मोठा उलटफेर? जयंत पाटलांच्या शिलेदारांना अजितदादा गटाची साद; 'या' नेत्याशी साधला तीनवेळा संपर्क!

बुद्धाचा धम्म म्हणजे निसर्गाचे नियम पाळणे आहे. विज्ञान कधीच अज्ञान स्वीकारत नाही तसेच बुद्धाचा धम्म आहे. त्रिसरण, पंचशील पाळणे म्हणजेच बुद्धाचा धम्म आचरणात आणणे होय. वर्षावासदरम्यान विविध बुद्धविहारांमध्ये तीन महिने उपासक-उपासिका उपोसथ शील, अष्टशील ग्रहण करतात.

- भदन्त करुणानंद थेरो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com