Vasant More : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंचा वंचित आघाडीत प्रवेश

वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवतील, असं वाटत होतं. परंतु पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्याने त्यांचा नाईलाज झाला.
vasant more news
vasant more newsesakal

Prakash Ambedkar : पूर्वाश्रमीचे मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. वंचितने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पक्षप्रवेश केला.

मागच्या काही वर्षांपासून वसंत मोरे हे मनसेमध्ये नाराज होते. अंतर्गत राजकारणावर त्यांनी सातत्याने भाष्य केलं होतं. परंतु त्यांनी कधीच राज ठाकरे यांच्यावरची निष्ठा ढळू दिलेली नव्हती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

vasant more news
Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

वसंत मोरे हे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवतील, असं वाटत होतं. परंतु पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्याने त्यांचा नाईलाज झाला.

त्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. दोघांमध्ये पुणे लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा झाली आणि मोरेंची उमेदवारी वंचितने जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी वसंत मोरे यांनी वंचितमध्ये अधिकृत प्रवेश केला.

vasant more news
Delhi Liquor Case : के. कविता यांची सीबीआय चौकशी करण्यास कोर्टाची परवानगी

'वंचित'चे २४ उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीने पहिल्या यादीत ८ उमेदवारांची घोषणा केली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये ११ जागांचा समावेश करण्यात आला होता. आणि तिसऱ्या यादीमध्ये चार उमेदवार जाहीर केले होते. तिसऱ्या यादीमध्ये वसंत मोरे यांच्या नावाचा समावेश होता. आतापर्यंत वंचितने २४ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

'वंचित'ची तिसरी यादी

  • नांदेड – अविनाश भोईकर

  • परभणी – पंजाब डख

  • औरंगाबाद -अफसर खान

  • पुणे – वसंत मोरे

  • शिरुर - मंगलदास बांदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com