Prakash Ambedkar : वसंत मोरे वंचितचे उमेदवार? प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर एकत्रित पत्रकार परिषद; म्हणाले...

''महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात होणार असून याबाबत ३१ मार्चपर्यंत अधिकृत माहिती दिली जाणार आहे. अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचा शेप दोन-दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झाली असून त्याचाच एक भाग होता.''
prakash ambedkar vasant more
prakash ambedkar vasant moreesakal

Pune Loksabha Election : लोकसभा निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा असलेले आणि त्यामुळे मनसेतून बाहेर पडलेले पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे वसंत मोरे हेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आजची बैठक सकारात्मक झाल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं. याबाबत दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याचंही ते म्हणाले. यावरुन पुणे लोकसभेसाठी वंचितचा उमेदवार ठरल्याचं स्पष्ट होत आहे. याची घोषणा ३१ मार्च किंवा १ एप्रिल रोजी होणार आहे.

prakash ambedkar vasant more
Shriniwas Patil: खासदार श्रीनिवास पाटलांची लोकसभेतून माघार; शरद पवार कोणाला देणार संधी?

प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वसंत मोरे म्हणाले की, आज पहिल्यांदाच चर्चेला आलेलो आहे. पुण्याची निवडणूक चौथ्या टप्प्यात असून लांब आहे. पुढच्या एक-दोन दिवसांमध्ये आणखी चर्चा होईल. आजची चर्चा सकारात्मक दृष्टीने झालेली आहे. उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकर दोन-तीन दिवसांमध्ये भूमिका जाहीर करतील.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वसंत मोरे यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाची चर्चा व्हायची आहे. महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणाची सुरुवात होणार असून याबाबत ३१ मार्चपर्यंत अधिकृत माहिती दिली जाणार आहे. अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचा शेप दोन-दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. आजची चर्चा ही सकारात्मक झाली असून त्याचाच एक भाग होता.

prakash ambedkar vasant more
Mukhtar Ansari Net Worth : जेलमध्ये बसून निवडणूक जिंकणारा माफिया डॉन... जाणून घ्या किती होती मुख्तार अंसारीची संपत्ती?

वंचितचे पहिल्या यादीतले उमेदवार

  • अकोला- ॲड. प्रकाश आंबेडकर

  • भंडारा-गोंदिया संजय गजानद केवट

  • गडचिरोली-चिमूर हितेश पांडुरंग मडावी

  • चंद्रपूर राजेश वारलूजी बेले

  • बुलडाणा- वसंत राजाराम मगर

  • अमरावती- प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान

  • वर्धा- प्रा. राजेंद्र साळुंके

  • यवतमाळ-वाशिम सुभाष खेमसिंग पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com