

G RAM G Bill Faces Criticism Over Increased State Spending
Esakal
पांडुरंग म्हस्के ः सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई, ता. १७ ः लाभाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या राज्य सरकारला ‘मनरेगा’ योजनेत बदल करून नव्याने आणण्यात आलेल्या ‘विकसित भारत - रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) (विकसित भारत- जी राम जी ) या विधेयकामुळे पुढील आर्थिक वर्षापासून राज्याच्या खर्चात किमान ६० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. या नव्या विधेयकात ग्रामीण विकासाच्या योजना अंतर्भूत करण्यात येणार असल्याने या विभागाच्या रस्ते बांधणीच्या कामासाठी केंद्राचा निधी उपलब्ध होईल.