Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढणाऱ्या 'वंचित'च्या उमेदवाराला धमकी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला वरळी मतदारसंघ प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही चर्चेत आला.

मुंबई : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेला वरळी मतदारसंघ प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही चर्चेत आला. दोन कोटी रुपये घेऊन निवडणुकीतून माघार घेण्यासाठी धमकावण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे वरळी मतदारसंघातील उमेदवार गौतम गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी वरळी पोलिसांत तक्रार दिली आहे. 

गायकवाड हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. गुरुवारी एकाने शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत गौतम गायकवाड यांची भेट घेतली आणि दोन कोटी रुपये घेऊन निवडणुकीतून माघार घेण्यास धमकावले. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी त्याच व्यक्तीने गायकवाड यांना फोन करून दादरमध्ये या आणि दोन कोटी रुपये घेऊन माघार घ्या, अशी धमकी दिली. याबाबत वरळी पोलिस ठाणे, मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांना धमकावणाऱ्यास पोलिसांनी बोलावून चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

माजी मंत्री रेड्डी येणार अडचणीत; सीबीआयकडून होणार चौकशी

निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी उमेदवाराला धमकावण्यात आल्याचा आम्ही निषेध करतो. "वंचित'च्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतल्याने शिवसेनेच्या पायांखालची वाळू सरकली आहे. मतदारांनाही भयभीत करण्याचा हा डाव आहे. तरी निवडणूक आयोगाने यात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. 

Vidhan Sabha 2019 : कसं काय पुणेकर ते चंपाची चंपी; भर पावसात तापला प्रचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VBA Candidate Gautam Gaikwad threaten Vidhan Sabha 2019