वेदांतानंतर राज्याची Tata Airbus साठी धडपड; जाणून नेमका प्रोजेक्ट काय?

राज्यासोबत करार झाल्याच्या 4 वर्षांच्या आत 16 विमानांची बांधणी पूर्ण करत एअरफोर्सला द्यावी लागणार आहेत.
वेदांतानंतर राज्याची Tata Airbus साठी धडपड; जाणून नेमका प्रोजेक्ट काय?

Tata Airbus Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट राज्यातून गेल्यानंतर आता टाटा-एअरबस प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या या प्रोजेक्टसाठी भाजपशासित राज्य असलेले उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्याकडून लॉबिंग सुरु आहे. नेमका हा प्रोजेक्ट काय आणि कसा आहे याबद्दल थोडक्यात.

वेदांतानंतर राज्याची Tata Airbus साठी धडपड; जाणून नेमका प्रोजेक्ट काय?
Vedanta Foxconn : नुसतं परदेशातील उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नसतात, तर...; सामंतांचा अजित पवारांवर पलटवार

- टाटा-एअरबस प्रोजेक्ट हा लष्करी विमानबांधणीचा प्रोजेक्ट असून, एकूण 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

- संरक्षण मंत्रालयाकडून या प्रकल्पाला आधीच हिरवा कंदील दाखवण्यात आला असून, यासाठी संरक्षण मंत्रालयाने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे.

- या प्रकल्पामध्ये मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार आहे.

- यामध्ये एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे.

- संरक्षण खात्याने एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेस ऑफ स्पेनसोबत २२ हजार कोटी रुपयांच्या ‘५६ सी-२९५’ या मध्यम आकाराच्या वाहतूक विमान खरेदीसाठी करार केला आहे. ही विमाने विद्यमान ‘एव्हरो ७४८’ विमानांची जागा घेणार आहेत.

वेदांतानंतर राज्याची Tata Airbus साठी धडपड; जाणून नेमका प्रोजेक्ट काय?
Vedanta: सरकारचा विरोधकांवरच पलटवार; फडणवीस रशियातून परतल्यावर होणार चर्चा

- या करारानुसार तयार १६ विमाने ४८ महिन्यांत दिली जाणार आहेत. तर ४० विमाने भारतात बनवली जाणार आहेत. या विमाननिर्मितीसाठी एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेस व टाटा अॅडवान्स सिस्टीम लिमिटेडसोबत १० वर्षांचे कंत्राट केले आहे.

- 5 ते 10 टन श्रेणी क्षमता असलेली विमाने, छोटी धावपट्टी किंवा पूर्ण तयार नसलेल्या धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असलेली विमाने यामध्ये विकसित केली जाणार आहेत.

- राज्यासोबत करार झाल्याच्या 4 वर्षांच्या आत 16 विमानांची बांधणी पूर्ण करत एअरफोर्सला द्यावी लागणार आहेत.

- 40 विमानांची टप्प्याटप्प्याने एअरबस आणि टीएएसएल निर्मिती करत 10 वर्षात करारपूर्ण करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com