Maharashtra Politics: शिंदे गटातील दिग्गज आमदार नाराज; लवकरच होणार राजकीय भूकंप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Group

Maharashtra Politics: शिंदे गटातील दिग्गज आमदार नाराज; लवकरच होणार राजकीय भूकंप?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे प्रतिनिधित्व करणारे शिंदे गटाचे कट्टर समर्थक आमदार सुहास कांदे नाराज चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नाराजीच्या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असतांना आमदार कांदे यांची गैरहजेरी. हेच नाही तर शिंदे गटाच्या कोणत्याही कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांची अनुपस्थिती सुहास कांदे नाराज आहेत का? याबाबत चर्चा सुरू झाली होती. दरम्यान यावर स्वतः सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

दरम्यान बोलताना सुहास कांदे म्हणाले की, मी नाराज नाही परंतु हे सांगताना कांदे यांनी नाराजीचा पाढा सांगितल्याचे दिसून आले. विशेषतः यासंदर्भात दादा भुसेंनाच जाब विचारण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला आहे. मला महत्त्वाच्या बैठकांना का बोलावलं जात नाही, हे दादा भुसेंना विचारा.

हेही वाचा: Eknath Shinde : ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पही निसटला, तरीही मुख्यमंत्री म्हणतात...

दरम्यान त्यांनी शिंदे गटासोबत आपण मरेपर्यंत असल्याचंही यावेळी सांगितलं आहे. आपण नाराज नसून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर आपला विश्वास आहे असंही कांदे यांनी स्पष्ट केलंय. सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघाचे आमदार असून ते शिंदे गटाचे आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तिय असणारे सुहास कांदे यांनी दादाजी भुसे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics : राज्यात राजकीय अस्थिरता वाढणार; संजय राऊत सुटताच ज्योतिषाचार्यांचं भाकित