

Maharashtra Rain Alert bay of bengal
esakal
Low Pressure Area Maharashtra : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. २४) विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.