मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला. 

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, उद्यापासून (ता. २९) राज्यात पाऊस कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पूर्व भारतातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या भटिंडापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. 

Web Title: Vidarbha Light rain