esakal | Viral Video :भाऊला झोप काय आवरली नाही, जेवता जेवताच ताटासह धाडकन पडला

बोलून बातमी शोधा

The video is going viral while the little boy is having a meal on social media.jpg}

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे पाहून तुम्हीही नक्कीच चकित व्हाल. 

Viral Video :भाऊला झोप काय आवरली नाही, जेवता जेवताच ताटासह धाडकन पडला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रोजच नव्याने सामान्य जीवनातल्या काही गोष्टी वगळता सोशल मीडियावर काही घडामोडी, गमतीदार व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. त्यातच सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस नक्कीच आठवतील, यात काही शंका नाही. 

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आहे. हा मुलगा काहीतरी खात बसलेला आहे. आणि जेवण करता करता अचानक त्या मुलाला झोप लागते. ही गोष्टच या व्हिडिओला एकदम हास्यास्पद बनवली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे पाहून तुम्हीही नक्कीच चकित व्हाल. 

या व्हिडिओसोबत एक कॅप्शन लिहिलेले आहे, 'काय होतं ते बालपण जेव्हा अगदी जेवता-जेवताही झोप येऊन जायची' हे व्हिडिओ खरचं खूप मजेदार आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या बालपणाची आठवण नक्कीच येते. या व्हिडिओत हा लहान मुलगा हातात प्लेट घेऊन बसला आहे. तो आपल्या हातानं खातो आहे. पण खाता-खाताच त्याला झोप येऊ लागते. त्याचे डोळे मिटायला लागले आहेत. तो हातात घास घेतो पण डोळ्यांवर झोप इतकी दाटून येते, की तो धाडकन खाली पडला आहे. तो खाली पडल्यावर एकाएकी त्याची झोप मोडते. 

हा व्हायरल व्हिडिओ अनेकांना खूप आवडतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखाहून जास्त लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचं बालपण नक्कीच आठवलं असेल.