विधान परिषद निवडणूक; काँग्रेस पक्षामध्ये आयारामांना विरोध | Nana Patole | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

विधान परिषद निवडणूक; काँग्रेस पक्षामध्ये आयारामांना विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‍काँग्रेसमध्ये (congress) बाहेरुन आलेल्या नेत्यांना लगेचच आमदारकीची (Member of legislative) संधी कशी देता, असा प्रश्न जुन्या नेते-पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नागपुरात भाजपतून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर (ravindra bhoyar) यांना उमेदवारी द्यावी, असा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचा तसेच त्यांच्या निकटवर्तीयांचा आग्रह आहे. मात्र बाहेरून आलेल्यांना संधी कितीदा देणार, प्रदेशाध्यक्ष बाहेरचे, प्रवक्ते बाहेरचे असे करत सगळा पक्षच बाहेरच्यांनी व्यापून टाकणार का,असा प्रश्न ज्येष्ठांनी केला आहे. पुढील टप्प्यात तर जुन्याजाणत्यांना प्रवेशच मिळणार नाही, असे काही जुन्यांनी दिल्लीला कळवले आहे.

हेही वाचा: RTI : कोविड फंडातून केवळ 25 टक्के रक्कमेचे वाटप; वाचा सविस्तर माहिती

नागपूर विधान परिषद निवडणुकीत माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना संधी दिली जावी, असा आग्रह धरला जात होता. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रचंड खर्चिक झाली आहे. त्यात लक्ष्मीदर्शन झाले तर मते फुटू शकतात असे मानले जाते. मुळक यांनी तनमनधनाने निवडणूक लढवावी, अशी दिल्लीची अपेक्षा आहे तर प्रदेशाध्यक्षांच्या निकटवर्तीयांना ही निवडणूक डॉ.भोयर मते फोडून जिंकू शकतील, असे वाटते.

यात एबीफॉर्म नागपूरला पोहोचला आहे पण त्यावर नाव कुणाचे लिहायचे हा पेच आहे. संघ परिवारात वाढलेले डॉ.भोयर काँग्रेसमध्ये येणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांना तिकीट देण्यात यावे असा आग्रह आहे.आज काँग्रेसमधून धुळे परिसरासाठी गौरव देवेंद्र वाणी यांना तर कोल्हापूर परिसरातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

loading image
go to top