Vidhan Sabha 2019 : जाणून घ्या, राज्यात दुपारपर्यंत कोठे किती टक्के झाले मतदान?

टीम ई-सकाळ
Monday, 21 October 2019

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. त्या उलट ग्रामीण भागात चुरशीने मतदान होत असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत मतदानाला शहर आणि जिल्हा निहाय संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या शहरांमध्ये महानगरांमध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही. त्या उलट ग्रामीण भागात चुरशीने मतदान होत असल्याचे पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यात बीड विधानसभा मतदारसंघात तसेच सोलापूर जिल्ह्यात माळशीरस विधानसभा मतदारसंघात वादावादीच्या घटना घडल्या आहेत. त्यात बीडमध्ये बोगस मतदारांना पकडण्यात आले असून, मिळशीरसमधील घटनेत दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. नेहमी प्रमाणे, मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी अत्यल्प आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहाही मतदारसंघांमध्ये चुरशीने मतदान होत असून, तेथे मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे. कोल्हापुरात यंदाही उच्चांकी मतदान होण्याची शक्यता आहे. 

पाहा कोठे किती झाले मतदान? (दुपारी तीनवाजेपर्यंत)

 1. वाशिम - 43.9
 2. गोंदिया - 54
 3. सातारा - 48 
 4. कोल्हापूर - 55 
 5. सिंधुदुर्ग - 30 
 6. नागपूर - 43
 7. भंडारा - 50 
 8. नाशिक - 42 
 9. जालना - 50.17
 10. मुंबई - 36 
 11. ठाणे - 33
 12. पुणे - 41.1
 13. गडचिरोली - 52.15
 14. नांदेड - 46.33
 15. परभणी - 47.50 
 16. अमरावती - 40
 17. जळगाव - 40
 18. धुळे - 45
 19. अकोला - 41
 20. पालघर - 44 टक्के 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 maharashtra voting turnout up to 3.30 pm mumbai pune kolhapur