esakal | Vidhan Sabha 2019 : मोदींच्या पहिल्या सभेच्या दिवशीच #मोदी_परत_जा ट्विटर ट्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

modi go back twitter trend in maharashtra modi parat ja

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. #मोदी_परत_जा

Vidhan Sabha 2019 : मोदींच्या पहिल्या सभेच्या दिवशीच #मोदी_परत_जा ट्विटर ट्रेंड

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा रविवार आहे आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. मोदी यांच्या प्रचार सभांना गर्दी उसळली असली तरी सोशल मीडियावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ट्विटरवर आज सकाळपासून #मोदी_परत_जा असा ट्रेंड पहायला मिळत आहे. ट्विटरवर वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत, तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे.

तरुणांना चंद्राची नव्हे, पोटाची काळजी : राहुल गांधी

ट्विटरवर मुद्दे काय आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांना आज जळगावमधून सुरुवात झाली. मोदींची ती पहिली सभा होती. या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना, तमीळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातही ट्विटरवर ‘गो बॅग मोदी’ अर्थात #मोदी_परत_जा महाराष्ट्रात विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली असताना, भाजपकडून कलम 370 रद्द केल्याचा मुद्दा प्रचारात मांडला जात आहे. त्यावर मराठी लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये नाराजी दिसत आहे. रोजगाराची सर्वांत मोठी समस्या असताना, भाजपमधून त्यावर ठोस काही बोलले जात नसल्यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्धच #मोदी_परत_जा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये तरुणांनी मोदींचे अनेक मिम्स शेअर केले आहेत. तसेच आरेतील वृक्षतोड, मंदीचा फटका, जवळपास 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, असे गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. पुण्यातील प्रस्तावित रिंगरोडचा मुद्दाही एकाने उपस्थित केला असून, जुमलेबाजी नही चलेगी, असे म्हटले आहे.

हिंमत असेल तर, कलम 370 पुन्हा आणून दाखवा : पंतप्रधान मोदी

तमीळनाडूतही मोदींना विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकतीच तमीळनाडूत चेन्नई येथे भेट झाली. त्यावेळी तमीळनाडूतील तरुणांनी ट्विटरवर #GoBackModi  असा हॅशटॅग सुरू केला होता. मोदी जिनपिंग यांच्या भेटीला चीनमधूनही मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे. मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळी तमीळनाडू दौऱ्यावर गेले. त्या त्या वेळी #GoBackModi  ट्रेंड पहायला मिळाला आहे. जानेवारीमध्ये मदुराईतील अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी तमीळनाडू दौरा केला होता. तसेच सप्टेंबरमध्ये आयआयटीच्या पदवीदान समारंभाला मोदी उपस्थित राहिले होते. या प्रत्येक वेळी सोशल मीडियावर #GoBackModi असा ट्रेंड पहायला मिळाला आहे.