esakal | Vidhan Sabha 2019 : हिंमत असेल तर, कलम 370 पुन्हा आणून दाखवा; मोदींचे विरोधकांना आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 pm narendra modi first campaign speech jalgaon

Vidhan Sabha 2019 : हिंमत असेल तर, कलम 370 पुन्हा आणून दाखवा; मोदींचे विरोधकांना आव्हान

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जळगाव : हिम्मत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जा. धाडस असेल तर, 370 आणि 35-अ कलम परत आणू, असे आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यात द्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा आज, जळगाव येथे झाली.  त्यात त्यांनी कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

मोदींच्या सभेपूर्वी नेत्यांमध्ये खडाजंगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या राष्ट्रहिताच्या निर्णयाला विरोध करत आहेत. शेजारी राष्ट्राची भाषा बोलत आहेत. पण, आमच्यासाठी जम्मू-काश्मीरबाबतचा निर्णय अटळ आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही तिहेरी तलाकचा विषयही असाच तडीस नेला. काँग्रेससह अनेक पक्षांनी त्याला विरोध केला. पण, मुस्लिम माता भगिनींना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण केले.' 

विराट कोहलीला जायचंय रायगडावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, '5 ऑगस्टला भारताने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याआधी हा निर्णय घेण्याचे धाडस होत नव्हते. जम्मू-काश्मीरमधील जनतेला वंचित ठेवले जात होते. त्या परिस्थितीत फक्त स्वतंत्रतावाद आणि दहशतवादाचा विस्तार होत होता. जम्मू-काश्मीर आणि लडाख केवळ जमिनीचा तुकडा नाही. तर, भारताच मस्तक आहे. त्या जमिनीतील कण-कण भारताला मजबूत करते. जम्मू-काश्मीरमध्ये 40 वर्षे जी आसामन्या परिस्थिती होती ती सामान्य होण्याला चार महिनेही लागले नाहीत.'

मोदी म्हणाले, 'भारताच्या जनतेमुळेच जगभरात जनतेचा डंका. महिलांनी ज्या पद्धतीने मतदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने मतदानात सहभाग घेतला. आता महाराष्ट्रात यावेळी महिलांनी पुरुषांच्या पुढे जाऊन मतदान करावे. पुरुषांना मागे टाकावे.'  

loading image