Vidhan Sabha 2019 : माझा शिवसेनेला विरोध नाहीच आणि नव्हता- नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शिवसेना विरोध मावळला असून माझा शिवसेनेला विरोध नाहीच आणि तो कधीच नव्हता असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा शिवसेना विरोध मावळला असून माझा शिवसेनेला विरोध नाहीच आणि तो कधीच नव्हता असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

भाजप प्रवेशावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, प्रवेशाची तारीख आणि वेळ ठरलेली नाही. प्रवेशासाठी प्रत्येक दिवस शुभ आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या विरोधाला मुख्यमंत्री जुमानत नाहीत. पण, माझ्या प्रवेशामुळे युती आणखी भक्कम होईल.

माझा आता कोणालाच विरोध नाही आणि कधीच नव्हता. शिवसेनेचे लोक संकुचित आहेत पण मी त्या वृत्तीचा नसल्याचेही राणेंनी यावेळी सांगितले. प्रचारात शिवसेनेला विरोध करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 no oppose to Shiv Sena says Narayan Rane