मुख्यमंत्री - पवार आज एकाच व्यासपीठावर 

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 30 जुलै 2019

मुंबई - भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा सुरू असताना उद्या (ता.30) ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

माजी विधिमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानगाथा या पुस्तकाचे उद्या विधानभवनात प्रकाशन होत असून या कार्यक्रमात राजकीय जुगलंबदी रंगण्याचे संकेत आहेत. 

सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. अनेक दिग्गज नेते व आमदार राष्ट्रवादीला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातच हर्षवर्धन पाटील यांच्याही पक्षांतराची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी ती फेटाळून लावलेली असली तरी उद्याच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री सध्याच्या पक्षांतराबाबत निश्‍चितच मार्मिक टिपण्णी करतील व शरद पवार त्यांना कशाप्रकारे उत्तर देतील याची उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे चौकशीची ससेमिरा लावतो या दहशतीखाली पक्षांतर करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी आत्मचिंतन करावे असे भाष्य केले होते. त्यामुळे, उद्याच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते आमने सामने येत असल्याने राजकीय टिकाटिपणी रंगणार हे निश्‍चित आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhanagatha book publication