Vidhan Sabha 2019 : भाजपचे बरेच नेते संपर्कात - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपतील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. असेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. योग्य वेळी त्यांची नावे घोषीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा 2019 : नागपूर - आमच्या पक्षातून बरेच नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. दुसरीकडे गेल्या तीन-चार वर्षांपासून भाजपतील काही नेते, कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. आता तेथे न्याय मिळणार नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. असेच ‘त्या’ पक्षातील काही नेते आमच्या संपर्कात आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज येथे म्हणाले. योग्य वेळी त्यांची नावे घोषित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शिवस्वराज्य यात्रेच्या नागपूर जिल्ह्याचा दौरा प्रारंभ करण्यापूर्वी जयंत पाटील आणि खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथील दीक्षाभूमीला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेतली. याबद्दल विचारले असता, माजी मंत्री रमेश बंग आणि विजय घोडमारे यांच्यासोबत चर्चा झाली. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विधानसभा निवडणुकीत आघाडी एकसंघपणे काम करून आपली ताकद दाखविणार आहे. शिवस्वराज्य यात्रेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेत आहोत. पुरोगामी विचारांनीच राज्याचा पाया भक्कम होणार आहे, असे ते म्हणाले.

ही त्यांची अखेरची तडफड - बावनकुळे
भाजपचे काही नेते संपर्कात आहेत. योग्य वेळी त्यांची नावे घोषित करू, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले असून, यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ही त्यांची अखेरची तडफड आहे. आता काहीच मार्ग दिसत नसल्याने निराशेतून त्यांनी हे विधान केल्याचे म्हटले आहे. 

रामटेक आणि काटोल या मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात बावनकुळे म्हणाले, ‘सीटिंग - गेटिंग’ फार्मुल्यानुसार रामटेक आणि काटोल भाजपकडेच राहतील. अर्थात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर याबाबत काय तो निर्णय होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 BJP Candidate Contact Jayant Patil Politics