विजय मल्ल्याविरोधात पुरवणी आरोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - परदेशात फरारी झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉड्रिंग; तसेच बॅंकांची सहा हजार 27 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विशेष ईडी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

या आरोपपत्राच्या आधारे ईडी फरारी आर्थिक अपराधी अध्यादेशान्वये मल्ल्या आणि त्याच्या कंपनीची नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागणार आहे.

हे आरोपपत्र भारतीय स्टेट बॅंकेच्या तक्रारीवर आधारित आहे. मल्ल्या आणि त्याच्या कंपनीने 2005 ते 2010 या कालावधीत बॅंकेकडून घेतलेले सहा हजार 27 कोटी रुपयांचे कर्ज फेडले नव्हते. कर्ज हेराफेरीसाठी बनावट कंपन्यांच्या समूहाचा उपयोग करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले होते. त्याचा उल्लेख या आरोपपत्रात आहे.

ईडीने आतापर्यंत या प्रकरणी मल्ल्याची नऊ हजार 890 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. त्यात अलिबागनजीकच्या मांडवा परिसरातील मल्ल्याचा बंगला, बंगळूर येथील किंगफिशर टॉवरमधील कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट्‌स, युनायटेड स्पिरीट्‌स लिमिटेड या कंपनीचे 25.114 लाखांचे शेअर, युनायटेड ब्रिवरेजचे चार कोटींचे शेअर आणि मॅकडोवेल होल्डिंग कंपनीचे 22 लाखांच्या शेअरचा समावेश आहे.

Web Title: vijay mallya oppose Supplementary charge sheet