Vijay Shivtare : ''नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करुन पवारांच्या विरोधात लढणार'', विजय शिवतारेंनी जाहीर केली भूमिका

Vijay Shivtare on Ajit Pawar : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात ठोस भूमिका घेतली असून दोन्ही पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गरज पडली तर नरेंद्र मोदी विचारमंच स्थापन करुन लढेल परंतु पवारांसाठी निवडणुकीत काम करणार नाही, असं ते म्हणाले.
Vijay Shivtare
Vijay Shivtareesakal

Vijay Shivtare on Ajit Pawar : शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात ठोस भूमिका घेतली असून दोन्ही पवारांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. गरज पडली तर नरेंद्र मोदी विचारमंच स्थापन करुन लढेल परंतु पवारांसाठी निवडणुकीत काम करणार नाही, असं ते म्हणाले.

'टीव्ही ९ मराठी'शी बोलतना विजय शिवतारे म्हणाले की, जरी महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत असली तरी आम्हाला निवडणुकीमध्ये वेगळा विचार करावा लागणार आहे. नरेंद्र मोदी हे शंभर टक्के पंतप्रधान झाले पाहिजेत, यात शंका नाही. परंतु भाजपने सांगितलं म्हणून आम्ही पवारांचं काम करणार नाही.

Vijay Shivtare
Christopher Nolan wins Oscar 2024 : आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नोलन झाला भावूक! डोळे पाणावले...

''निव्वळ अजित पवार इकडे आले म्हणून काही होत नाही. कारण त्यांना कंटाळून लोक पक्ष सोडून गेलेले होते. जर त्यांनाच मतदान करायला भाजप सांगत असेल तर हे मला मान्य नाही. लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्यातून मतदारांना आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाली पाहिजे. दोन्ही पवारांच्या लढाईमध्ये मी उतरणार म्हणजे उतरणार'' अशी स्पष्टोक्ती शिवतारेंनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ५० वर्षे ज्यांनी आम्हाला छळलं आहे त्यांना निवडून देण्याची आमची मानसिकता नाहीये. त्यामुळे मी धाडस करुन अपक्ष उभा राहणार किंवा नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन करणार, काहीही करणार.. मी महायुतीच्या विरोधात नाही, नेत्यांच्या विरोधात नाही. आमचा विरोध हा पवारांना आहे.

Vijay Shivtare
WTC Point Table : पुन्हा भारत-ऑस्ट्रेलिया होणार फायनल? कांगारूंनी न्यूझीलंडविरूद्धची मालिका 2-0 ने जिंकतात बदललं समीकरण

''लोकांना संधी तर मिळाली पाहिजे. लोक सध्या संभ्रमात आहेत. मोदी हेच देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, कारण भाजपचं अंतिम उद्दिष्ट हे देश आहे. देशाप्रती त्यांची निष्ठा आहे. त्यामुळे सगळे भाजपसोबत येत आहेत. अजित पवार जरी आले असले तरी ते का आले हे सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही पवार नको म्हणून आम्ही तिसरा पर्याय ठेवत आहोत. पवारांनी दुसरा एखादा माणूस दिला तर आम्ही नक्कीच काम करु. परंतु पवारांनी या भागाचं नुकसान केलं असून आम्ही त्यांचं काम करणार नाही, असा थेट इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com