Christopher Nolan wins Oscar 2024 : आयुष्यातलं पहिलं ऑस्कर, ओपनहायमरचा दिग्दर्शक नोलन झाला भावूक! डोळे पाणावले...

नोलानला त्याच्या आयुष्यातील पहिला ऑस्कर मिळाला आणि त्याच्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Christopher Nolan Reaction
Christopher Nolan Reaction esakal

Christopher Nolan wins his first ever Oscar : हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन हा आता यशाच्या शिखरावर आहे. त्याच्या नावाची साऱ्या जगभरामध्ये चर्चा आहे. त्याचे कारण त्याला त्याच्या आयुष्यातील पहिला ऑस्कर (Nolan Latest News) मिळाला आहे. तब्बल १३ नामांकनं नोलन दिग्दर्शित ओपनहायमरला होती. या सगळ्यात त्यानं ७ पुरस्कार मिळवले. नोलन हा त्याच्या अनवट शैलीच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे.

यापूर्वी नोलनच्या फिल्मोग्राफीवर लक्ष टाकले तर आपल्या इन्सेप्शन, बॅटमॅन, इंटरस्टेलर, डंकर्क, टेनंट सारख्या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. या सगळ्या (Christopher Nolan wins his first ever Oscar news) चित्रपटांमधून त्यानं काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या चित्रपटातून समाजातील वेगवेगळ्या विचारसरणी आणि प्रवृत्तींवर तितक्याच परखडपणे भाष्य करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये नोलनचा समावेश करण्यात येतो. सध्या त्याला ऑस्कर मिळाल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

९६ वा ऑस्कर सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडला. याला जगभरातील (Oscar 2024 latest News) सिनेमा क्षेत्रातील मान्यवर हजर होते. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ओपनहायमरची चर्चा रंगल्याचे दिसून आले आहे. नोलानला यापूर्वी त्याच्या डंकर्क या चित्रपटासाठी २०१८ मध्ये नामांकन मिळालं होतं. त्यावेळी त्याला तो पुरस्कार मिळणार असे बोलले जात होते. मात्र ऑस्करनं त्याला हुलकावणी दिली. पण हार मानेल तो नोलन कसला, त्यानं ओपनहायरमचं दिग्दर्शन केलं आणि वेगळाच इतिहास घडवला.

यावेळी नोलनला स्पर्धा होती ती प्रतिभावंत दिग्दर्शक मार्टिनी स्कोर्सेसी, जस्टिन ट्रायट आणि योर्गास लॅथिमोस यांच्या चित्रपटांची. ओपनहायरमची निर्मिती आणि लेखन नोलननं केलं आहे. त्यात सिलियन मर्फीची मुख्य भूमिका आहे. त्याला यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्कर मिळालं आहे. तर रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरला सहाय्यक अभिनेत्यासाठीचं ऑस्कर मिळालं आहे. सिलियनची प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे. त्यानं आपला पुरस्कार जगभरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून झटणाऱ्यांना अर्पण केला आहे.

Christopher Nolan Reaction
Oscar Winner 2024 : 'ओपनहायमर' ठरला 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', सिलियन मर्फीला 'सर्वोत्कृष्ट अभिनया'साठी ऑस्कर! वाचा विजेत्यांची पूर्ण यादी

नोलननं म्हटलं आहे की, चित्रपटांचा इतिहास हा शंभर वर्षांचा आहे. मला माहिती नाही की, माझा प्रवास आणखी कुठपर्यत जाणार आहे. पण जो प्रवास आहे तो बाकी कमालीचा भन्नाट आहे. पण जे काही निर्मिती केली आहे त्याची साऱ्या जगानं घेतलेली दखल माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. मला माहिती आहे माझ्या कामाचा जो स्केल आहे तो ग्लोबल आहे. त्यामुळे येणाऱ्या संधीचा कसा उपयोग करता येईल याचा विचार करावा लागेल. अशा शब्दांत नोलननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पुरस्कारानं आणखी एक जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. ती म्हणजे पुन्हा सर्जनशील आणि वेगळ्या विषयांवरील कलाकृती निर्माण करणे. ती जबाबदारी वाढते. असंही नोलननं म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com