उंदीर, घुशींनी पोखरल्यानेच फुटला कालवा : शिवतारे

Vijay Shivtare Talked about Canal Broke in Assembly Council
Vijay Shivtare Talked about Canal Broke in Assembly Council

मुंबई : अतिक्रमणं आणि उंदीर, घुशी तसेच खेकड्यांनी पोखरल्यामुळेच पुण्यातील मुळा-मुठा कालवा फुटला, असे स्पष्टीकरण राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज (गुरुवार) विधानपरिषदेत दिले. याबाबत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुळा-मुठा कालवा फुटून मोठी हानी झाली होती. तसेच अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. त्यानंतर आज विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना आमदार गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना शिवतारे म्हणाले, की कालवा दुरुस्तीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मुळा-मुठा कालवा फुटीप्रकरणाची चौकशी येत्या 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच कालवा फुटल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन उपस्थित होते का? आपत्ती व्यवस्थापनाने काय कार्यवाही केली? यासंदर्भातही त्याचप्रमाणे कालव्याच्या बाजूला बोअरवेल खोदून टँकर लॉबी सुरू असल्याची चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही शिवतारे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मागील 27 सप्टेंबरला मुळा-मुठा कालव्याची भिंत फुटल्याने सिंहगड रस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com