Vidahan Sabha 2019 : तर 'त्या' दहा जागांवरील आमचे लोक जातील पळून- वडेट्टीवार

अशोक गव्हाणे
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

कोणत्या जागांवर मतभेद आहेत हे विचारले असता ते सांगता येणार नाही. नाहीतर त्या जागांवरील आमचे लोक पळून जातील असे विजय वडेट्टीवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे. 

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाज आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आठ ते दहा जागा सोडल्यास कुठली जागा कोण लढणार हेही निश्चित झाल्याचे काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्या जागांवर मतभेद आहेत हे विचारले असता ते सांगता येणार नाही. नाहीतर त्या जागांवरील आमचे लोक पळून जातील असे विजय वडेट्टीवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत 10 जागांवरून मतभेद असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले.

दरम्यान, राष्ट्रवादी सोबत 106 जागांवर बोलणी झाली असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. ज्या 10 मतदारसंघावर मतभेद आहेत त्या मतदारसंघाविषयी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात येणार असून अंतिम यादीही तयार झाली असल्याचे सांगितले आहे. येत्या 05 तारखेला  काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Vadettiwar clarifies about dispute of 10 seat in NCP and congress