'राज्यपाल हिमालयातले, तिकडे सर्वांना...', वडेट्टीवारांनी लगावला टोला|Vijay Wadettiwar on Bhagatsingh Koshyari | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Wadettiwar on Bhagatsingh Koshyari

'राज्यपाल हिमालयातले, तिकडे सर्वांना...', वडेट्टीवारांनी लगावला टोला

नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य (Koshyari Controversial Statement Chhatrapati Shivaji Maharaj) केले आहे. त्याचे पडसाद उमटले असून सरकारमधील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून राज्यपालांचा निषेध करण्यात येत आहे. त्यावरूनच आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

हेही वाचा: राज्यपालांच्या वक्तव्यावरून वाद पेटला! राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेड आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्या गुरुंची गरज नव्हती. ते स्वयंनिर्माते होते. राजे स्वयंप्रकाशीत होते. त्यांना गुरू लागत नाही. हिमालयात सर्वांना गुरू लागतो. राज्यपाल देखील तिकडचे आहेत, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. तसेच राज्यपालांचं महाराजांबद्दलचं वक्तव्य अपमानजनक आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी आरक्षणावर बुधवारी सुनावणी -

निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. आता ओबीसी आरक्षणावर बुधवारी सुनावणी होणार आहे. बुधवारी ओबीसींच्या बाजूनं निकाल लागले, अशी आशा आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

''...म्हणून युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही'' -

२५ ते ३० हजार भारतीय मुलं युक्रेनमध्ये आहेत. ४० किलोमीटर प्रवास करून देखील थंडीत उघड्यावर झोपले. दोन विमान आले म्हणजे सर्व विद्यार्थी परत आले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारी खर्चाने घरांपर्यंत पोहोचवणार आहे. केंद्र सरकारने सुरू केलेलं ऑपरेशन गंगा वाहून जाता कामा नये. केंद्र सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांना परत आणावे. पोलंडचे राजदूत मदत करत नाही,. त्यांना ताकीद देण्याची गरज आहे. नाटोमध्ये भारतानं समर्थन न केल्याने युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना मदत करत नाही. याकडे त्वरीत लक्ष घालणं गरजेचं आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Vijay Wadettiwar Criticized Governor Koshyari Controversial Statement Chhatrapati Shivaji Maharaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top