Vijay Wadettiwar lashes out at Mahavikas Aghadi over seat distribution issues: विधानसभा निवडणुकीतील पराभावनंतर आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. आता तिन्ही पक्षांमधील मतभेद पुढे येत आहेत. राष्ट्र्वादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटावर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे. वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.