Vijaykumar Gavit : आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांचे वेतन थांबणार नाही; विजयकुमार गावित

भाजप शिक्षक आघाडीच्या सभेत निर्णय
Vijaykumar Gavit statement salary of teachers in tribal ashram schools will not stop
Vijaykumar Gavit statement salary of teachers in tribal ashram schools will not stopsakal

राज्यात आदिवासी विकास विभागातील निर्णय ८ जून २०१६ काम नाही वेतन नाही या शासन निर्णयावर तोडगा काढण्याकरिता भाजप शिक्षक आघाडीच्या डॉ. कल्पना पांडे, डॉ.उल्हास फडके व अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वात आदिवासी आश्रम शाळा कार्यकारणीची बैठक मा. डॉ. विजयकुमार गावित, मंत्री आदिवासी विकास विभाग, उपसचिव व डॉ.रवींद्र ठाकरे, अपर आयुक्त नागपूर विभाग यांच्यासोबत संपन्न झाली.

आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत स्वयंसेवी संस्था मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आश्रम शाळा चालविल्या जातात. काही आश्रम शाळा शासनाच्या ध्येयधोरणानुसार संस्थाचालक चालवित नसल्याने तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थी पटसंख्या अभावी कायमस्वरूपी बंद पडत असल्याने अशा आश्रम शाळांची शासनाकडून कायमस्वरूपी मान्यता रद्द केली जात होती. त्यामुळे आश्रम शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरत होते व जोपर्यंत सदर शाळेची मान्यता येत नाही किंवा अन्य स्वयंसेवी संस्थेत आश्रम शाळा हस्तांतरित होत नाही.

किंवा समायोजन होत नाही तोपर्यंत कार्यरत असलेले अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नव्हते, शाळेची मान्यता रद्द होणे किंवा संस्थाचालकांच्या अनागोंदी कारभारामुळे शाळा बंद पडणे या बाबी करिता शिक्षकांना जबाबदार धरणे व त्यांचे वेतन थांबवणे ही बाब नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असून प्रचलित तरतुदीचे उल्लंघन करणारी आहे असा युक्तिवाद नागपूर विभागीय अध्यक्ष,अनिल शिवणकर यांनी मा.मंत्री महोदयांसोबत केला त्यावर माननीय मंत्री महोदयांनी पुढील काळात कोणत्याही शाळेची मान्यता काढणे ,संस्थेचे हस्तांतरण व आश्रम शाळा बंद करण्याच्या सहा महिने आधी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन संस्था शिक्षकांसह हस्तांतरण करण्यात येईल.

इतर बाबतीत कर्मचाऱ्यांचे आधी समायोजन करण्यात येईल असे नवीन शासन निर्णय निर्गमित होणार असून सहकार्य न करणाऱ्या संस्था चालकांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे मा.मंत्री महोदयांनी सभेला सांगितले तसेच आश्रम शाळेतील वैयक्तिक व सामूहिक समस्यांवर देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभेला डॉ.कल्पना पांडे,डॉ.उल्हास फडके, अनिल शिवणकर, सुनील ससनकर, लोमेश दरवडे, प्रदीप बिबटे, संदीप उरकुडे , प्रदीप चौधरी, सुंदरसिंग राठोड , शैलेश यावले व इतर आश्रम शाळा विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रति,

माननीय संपादक व पत्रकार महोदय,

वरील वृत्त आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रात छायाचित्रासह प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती, धन्यवाद!

आपला

अनिल शिवणकर, नागपूर विभागीय अध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com