esakal | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून निर्णय झाला, न्याय नाही : पासलकर
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha_Kranti_Morcha

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आरक्षणाबाबत समन्वयकांसोबत सविस्तर चर्चा करून कायदेशीर कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले.

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाकडून निर्णय झाला, न्याय नाही : पासलकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षणाबाबत न्यायाची अपेक्षा होती; परंतु पुन्हा न्यायालयाकडून निर्णय झाला, न्याय झाला नाही, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे विकास पासलकर यांनी व्यक्‍त केली. 

पासलकर म्हणाले, उच्च न्यायालयाने दिलेले मराठा आरक्षण टिकविण्यासाठी मराठा समाजाचे शंभर वकील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार, तसेच उदयनराजे भोसले, संभाजीराजे भोसले, राजेंद्र कोंढरे, राजेंद्र दाते पाटील, संजय लाखे पाटील, वीरेंद्र पवार, आबा पाटील, दिलीप पाटील, विलास सुद्रिक, पंकज घाग, कांचन पाटील वडगावकर, दशरथ पाटील, प्रज्ञा जाधव, आप्पा कूढेकर, संजीव भोर, जगन्नाथ काकडे तसेच राज्यभरातील समन्वयकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले.

म्हाडाच्या 5647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी उद्यापासून; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

मराठा समाजाला दिलेले आरक्षण इतर कोणाच्याही आरक्षणाला बाधा न आणता दिलेले आहे. परंतु त्याला काहींनी जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मराठा आरक्षणाची मागणी जुनी असून, गेली 30 वर्षे मराठा आरक्षणाचा लढा सातत्याने चालू आहे. मराठा समाजामध्ये शेतीचे विभाजन झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागास ठरला आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूण विद्यार्थी शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहत आहेत, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकरीत त्यांना संधी मिळू शकते. 

Gold-Silver prices: सोन्याच्या किमतींमध्ये घसरण, चांदीचे दरही गडगडले​

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आरक्षणाबाबत समन्वयकांसोबत सविस्तर चर्चा करून कायदेशीर कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. कायदेशीर प्रक्रियेमध्ये मराठा समाजाची बाजू समजून घेतली. तसेच, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत आघाडी सरकारबरोबर समन्वय साधून न्याय देण्याचे आश्वासन दिल्याचे पासलकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image