
जागतिक पातळीवरील कमकुवत ट्रेंड आणि डॉलरच्या तुलनेत रुपया फ्लॅट राहिल्यामुळे सोने- चांदीच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
नवी दिल्ली : आज भारतीय कमॉडिटी मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आज जागतिक बाजारपेठेतील बदलाचा परिणाम होऊन देशात सोने 118 रुपयांनी घसरून 49 हजार 221 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. मंगळवारच्या सत्रात सोने प्रति 10 ग्रॅम 49 हजार 339 रुपयांवर बंद झाले होते.
- मुंबई शेअर बाजाराचा नवा विक्रम, सेन्सेक्स 'ऑल टाइम हिट'
चांदीही घसरली-
आज चांदीच्या भावातही घट झाली आहे. आज चांदीचा भाव 875 रुपयांनी घसरून 63 हजार 410 रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदी अनुक्रमे 1860 आणि 24.22 अमेरिकन डॉलर प्रति औंस झाले आहे.
- मोठी बातमी! टेक होम सॅलरीमध्ये होणार घट? जाणून घ्या कारण
घसरण कशामुळे
सोने-चांदीच्या भावातील घसरणीमुळे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमॉडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, आज दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 118 रुपयांनी कमी झाल्या आहेत. जागतिक पातळीवरील कमकुवत ट्रेंड आणि डॉलरच्या तुलनेत रुपया फ्लॅट राहिल्यामुळे सोने- चांदीच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
सामान्य जनतेला दिलासा नाहीच; पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या
किंमती चढउताराची प्रमुख कारणे-
अमेरिकी डॉलरमधील चढउतार, कोरोना महामारी आणि संबंधित निर्बंध, प्रमुख अर्थव्यवस्थांची संमिश्र आर्थिक आकडेवारी, अतिरिक्त प्रोत्साहन पॅकेज आणि ब्रेक्झिट अनिश्चितता यामुळे सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार होत असल्याचे दिसून येत आहे.
- अर्थविश्वसंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)