म्हाडाच्या 5647 सदनिकांसाठी अर्ज नोंदणी उद्यापासून; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार 880, दिवे येथे 14 तर सासवड येथे चार सदनिका आहेत.

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) कार्यक्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार 647 सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन सोडत जानेवारीत काढणार आहे. त्यासाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरूवारी (ता. 10) दुपारी अडीच वाजता मुंबईत होणार आहे. त्यानंतर म्हाडा अंतर्गत सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाईन नोंदणी सायंकाळी पाच वाजता सुरु होईल. 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही. आर श्रीनिवासन आणि म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली. 

मोदी सरकारच्या कानाखाली आवाज काढणे गरजेचे; धनंजय मुंडे कडाडले

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे 514, तळेगाव दाभाडे येथे 296, सोलापूर जिल्ह्यात गट क्रमांक 238/1, 239 करमाळा येथे 77 आणि सांगली येथे सर्व्हे क्रमांक 215/3 येथे 74 सदनिका अशा एकूण 961 सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. पुणे येथील मोरवाडी पिंपरी येथे 87, पिंपरी वाघेरे येथे 992 अशा एकूण एक हजार 79 सदनिका आहेत. तर, सांगली येथे 129 सदनिका आहेत. 

ट्रम्प आणि एलियन्सची युती? इस्त्राईलच्या माजी अंतराळ प्रमुखांचा धक्कादायक दावा​

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार 880, दिवे येथे 14 तर सासवड येथे चार सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात 82 सदनिका अशा एकूण एक हजार 980 सदनिका आहेत. 
वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात 410, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात एक हजार 20 आणि कोल्हापूर महापालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत.

सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी : 
10 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून 11 जानेवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत 
- संकेतस्थळ - https://lottery.mhada.gov.in

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration for sale of 5647 flats of Pune MHADA will begin tomorrow