
लातूर : आपण २१ व्या शतकात वावरत असलो तरी जातीभेद काही कमी झाल्याचे दिसत नाही. दोन दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यात एका विशिष्ट समाजाला पाणीपुरवणा नाकारला होता. यामुळे गावकऱ्यांनी चांगलेच आंदोलन पुकारले हेते. ही घटना ताजी असतानाच मंदिरात नारळ फोडल्याने मागासवर्गीय कुटुंबावर गावाने बहिष्कार (Village boycott on backward class families) घातला. पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी ही घटना लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.
ताडमुगळी गावातील मागासवर्गीय कुटुंबातील तरुणाने गावच्या मंदिरात नारळ (Coconuts were broken in the temple) फोडला म्हणून बहिष्कार टाकण्यात आला. तीन दिवसांपासून या कुटुंबावर बहिष्कार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवळ हे गाव आहे. तरुणाने गावातील मंदिरात नारळ फोडल्यानंतर गावातील लोकांनी त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला होता. गावकीत सहभाग नको, किराणा, दळण बंद, शेतातील मजुरीसाठी बोलावणे बंद केले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चर्चा करून प्रकरण मिटवले.
घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला. आता या प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करून अशा समाजकंटाकावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. मात्र, बहिष्काराचे हे अस्त्र सर्वप्रथम कोणी उगारले?, कुणी पुढाकार घेतला? याबाबतची माहिती अद्याप पुढे आलेली नाही. पोलिसांनी हे प्रकरण मिटवल्याने अद्याप गुन्हा दाखल केला गेलेला नाही.
अमरावतीची पुनरावृत्ती
दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या (Amravati) सावंगी मग्रापूर गावाच्या उपसरपंचाने दलितांचा पाणीपुरवठा बंद केला होता. २८ दिवसांपासून हे ग्रामस्थ पाण्यासाठी तडफडत होते. पाणीपुरवठाच होत नसल्याने या कुटुंबीयांनी गाव सोडून गाववेशीवर ठिय्या मांडला होता. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे म्हणजे महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.