सीईओंच्या पुढाकारातून सुधारणार गावे! शिक्षण, आरोग्य सुविधा सुधारणार; ‘आमचा गाव आमचा विकास’ आराखड्यात सर्वांगिण विकासाला प्राधान्य

जिल्ह्याचे विभागप्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती व प्रत्येकी एक शाळा, अंगणवाडी, आरोग्यवर्धिनी केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना एक चांगले मॉडेल करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत.
solapur zp ceo manisha awhale
solapur zp ceo manisha awhale sakal

सोलापूर : पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत २०२४-२५मध्ये ‘आमचा गाव आमचा विकास’चा आराखडा तयार करताना गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या निधी उपलब्धतेनुसार सर्व योजनांचा कृती संगम करण्यासाठी जिल्ह्याचे विभागप्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी समन्वय साधणे आवश्‍यक आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती व प्रत्येकी एक शाळा, अंगणवाडी, आरोग्यवर्धिनी केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाना एक चांगले मॉडेल करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत.

पंधाराव्या वित्त आयोगांतर्गत पुढील वर्षीचा ‘आमचा गाव आमचा विकास’चा आराखडा तयार करण्याच्या निमित्ताने बुधवारी (ता. २८) मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी पूर्व नियोजन बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) इशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, आनंद मिरगणे, सचिन खुडे, माणिकराव बिचुकले, विनायक गुळवे उपस्थित होते. दरम्यान, सीईओ आव्हाळे म्हणाल्या, आराखडा तयार करताना गावात पूर्वी केलेली कामे, खर्च झालेला निधी याचाही विचार करावा.

शिवाय यावर्षीच्या आराखडा तयार करताना इतर योजनांचा निधी तसेच सीएसआर फंड उपलब्धतेसाठी सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. कोणत्या तालुक्याने अंगणवाडी, शाळा, पशूसंर्वधन दवाखाना, आरोग्य केंद्र मॉडेल करायचे, याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे संपूर्ण आराखडा गावाच्या सर्वांगिण विकासाचा असावा असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामस्थांच्या हातांना काम देण्यास प्राधान्य

ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाचे आदर्श मॉडेल करताना ग्रामस्थांची सोय होईल किंवा त्यांना रोजगार उपलब्ध होईल अशी कामे सुचवावीत. यापूर्वी काही गावांनी सर्वांसाठी पिठाची चक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र, सौरऊर्जा अशी कामे सुचवली होती पण, ही कामे कागदावरच राहिली. त्यामुळे आता आगामी वर्षाचा विकास आराखडा करताना रोजगार, त्यांचे स्वावलंबन याला प्राधान्य असावे, अशी सूचना काही गावकऱ्यांनी केली आहे.

सीईओंकडून तालुकानिहाय जबाबदारी

  • दक्षिण सोलापूर : अंगणवाडी

  • मोहोळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

  • माळशिरस : स्वच्छ भारत मिशन-दोन (ग्रामीण) अंतर्गत कामे

  • बार्शी : पशुसंवर्धन दवाखाना

  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) : प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com