solapur zp election
sakal
कामती गट! मोहोळमधील ६ गटात सर्वाधिक मताधिक्य विमल खताळ यांचे; माजी आमदार राजन पाटलांसह दोन्ही मुलांची साथ, खताळ यांना मिळू शकते झेडपीची समिती, वाचा...
तात्या लांडगे
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कामती बु. गटात एकूण २० गावे आहेत. नांदगाव, विरवडे खुर्द, विरवडे बु., शिरापूर मो., पिरटाकळी या पाच गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील यांना अधिक मते मिळाली. पण, बाकीच्या १५ गावांमध्ये भाजपच्या विमल तानाजी खताळ यांना चांगले मताधिक्य मिळाले. विमल खताळ यांना १३ हजार ३९० मते मिळाली तर अश्विनी पाटील यांना सात हजार ९६७ मते मिळाली. पाच हजार ४२३ मताधिक्याने खताळ या विजयी झाल्या. मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खताळ कुटुंबीयांवर मतदारांनी सलग दुसऱ्यांदा विश्वास दाखविला.
राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अक्षय खताळ हेही त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्याबरोबर अक्षय खताळ यांचे मैत्रीचे संबंध आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही अक्षय खताळ यांची भेट घेतली होती. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपने सर्व्हे केला आणि त्यात खताळ यांचेच नाव आघाडीवर होते.
राजन पाटील यांच्यासह अजिंक्यराणा व विक्रांत पाटील यांनीही खताळ यांनाच पसंती देत भाजपची उमेदवारी दिली. जिल्हा परिषदेचे दिवंगत सदस्य तानाजी खताळ यांनीही कामती गटात विकासकामे केली होती. त्यांच्यानंतर अक्षय खताळ यांनी तरुणांचे नेटवर्क उभारून सामाजिक कार्यातून गटात आपला नावलौकिक केला होता. या निवडणुकीत राजन पाटील यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनी अक्षय खताळ यांना साथ दिली आणि विमल खताळ या विजयी झाल्या. पंचायत समितीच्या कामती बु. व सावळेश्वर गणातील दोन्ही उमेदवार देखील चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.
‘या’ गावांनी निश्चित केला खताळांचा विजय
जिल्हा परिषदेच्या कामती बु. गटातील लांबोटी, कोळेगाव, गोटेवाडी, कोरवली, कामती बु., शिंगोली-तरटगाव, हराळवाडी या गावांतून विमल खताळ यांना सर्वाधिक मते मिळाली. त्याखालोखाल सावळेश्वर, चिंचोली काटी, पोफळी, अर्जुनसोंड, मुंढेवाडी, दादपूर, लमाणतांडा, कामती खुर्द या गावांमधूनही खताळ यांना विरोधकांच्या तुलनेत अधिक मते मिळाली आहेत.
मोहोळमधील सहा उमेदवारांचे मताधिक्य
उमेदवार गट पक्ष मताधिक्य
विमल खताळ कामती बु. भाजप ५,४२३
विजयराज डोंगरे आष्टी राष्ट्रवादी काँग्रेस ४,५४५
सचिन जाधव कुरुल भाजप १,३०३
चरण चवरे पेनूर शिवसेना ७५२
लखन शिंदे नरखेड भाजप ६१०
बालाजी नरुटे पोखरापूर भाजप ५२८
मोहोळ तालुक्याला एक समिती शक्य?
जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि शिक्षण व आरोग्य अशा पाच समित्या असतात. मोहोळ तालुक्याला आतापर्यंत कधीही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळालेला नाही. पण, राजन पाटील यांचे समर्थक सुशांत कादे, जालिंदर लांडे, कल्पना निकंबे यांना विविध समित्यांवर संधी मिळाली. याशिवाय विक्रांत पाटील उपाध्यक्ष झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेत भाजपला पहिल्यांदा बहुमत मिळाले असून, मोहोळ तालुक्यात चार सदस्य विजयी झाले आहेत. जातीय समीकरणांची जुळवाजुळव, आगामी राजकीय स्थितीचा विचार करता मोहोळ तालुक्याला एक समिती मिळू शकते. त्यात विमल खताळ की अन्य कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

