अनिल परब हे 'मातोश्री'चे वसुलीमंत्रीच; विनायक मेटेंचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

परिवहन आणि विधिमंडळ अशी दोन्ही खाती यांच्याकडे आहेत.

अनिल परब हे 'मातोश्री'चे वसुलीमंत्रीच; विनायक मेटेंचा हल्लाबोल

मुंबई - गेले काही दिवस राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकार एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. या सरकारचा धिक्कार असो अशी टीका विरोधकांकडून होत आहे. दरम्यान मुंबईतील आझाद मैदान येथे कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असून सरकारकडून ते दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. दरम्यान आता आमदार विनायक मेटे यांनीही राज्यसरकारला धारेवर धरलं आहे. आंदोलनाच्या मुद्द्यावरून मंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी टीका केली आहे.

ते म्हणतात, परिवहन आणि विधिमंडळ अशी दोन्ही खाती यांच्याकडे आहेत. ते मातोश्रीचे वसुली मंत्री आहेत. ज्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपद भोगत आहात, त्यांची विचारपूसही तुम्ही करत नाही. तुम्ही आई वडीलांनाच विसरून जात आहात. माननीय अनिलराव साहेब तुम्ही इथे आलात तर कुणी मारणार नाही. तसेही तुम्ही पोलिसांना हँडल केले आहे, असा टोला त्यांना लगावला आहे. आपल्या लोकांमध्ये या आणि आपण चर्चा करू, असा सल्लाही आमदार मेटे यांनी दिला आहे.

हेही वाचा: सलमान खुर्शीद यांना ISIS संघटनेच्या ताब्यात द्या ; नितेश राणे

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा एसटी कामगारांना संप मागे घेण्याचं आणि कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर जावं, नुकसान होणार नाही. राजकीय पक्ष आपला वापर करत आहेत, त्यामुळे वेळीच सावध होऊन कामावर येण्याच आवाहन त्यांनी केले आहे.

loading image
go to top