Vinayak Mete Death: मेटेंच्या निधनानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Mete

Vinayak Mete Death: मेटेंच्या निधनानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे निधन झाले आहे. ते मराठा समाजाच्या बैठकीला मुंबईत येत असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर माडप बोगद्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

(Vinayak Mete Death)

त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला असून त्यांच्या जाण्याने मराठा समाजातील मोठी पोकळी भरून काढणे कठीण आहे अशा शब्दांत अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"मराठा समाजासाठी मोठं काम त्यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठा अभिमान त्यांना होता. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता. अतिशय उमदे असे ते नेते होते. आणि मराठा समाजासाठी त्यांनी प्रचंड काम केलं आहे आणि मराठा समाजाच्या बैठकीला येतानाचा त्यांचे निधन होण ही खूप धक्कादायक आहे. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्यातून त्यांनी काही उमेदवारही निवडून आणले होते. असा उमदा नेता अचानक निघून जाणे हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." अशा शब्दातं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.