Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला; नेमकं काय घडलं? VIDEO

MLA Vinayak Mete Accident Death
MLA Vinayak Mete Accident Deathesakal
Updated on

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. त्यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेरची ठरली. त्यांच्या अपघाता व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (MLA Vinayak Mete Accident Death)

विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला आहे. या अपघातात मेटे हे जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.

तसेच, मृत्यूपूर्वीचा विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर आला आहे. या मध्ये विनायक मेटे यांचा रक्तबंबाळ झालेला चेहरा दिसत आहे. पिवळ्या रंगाचा एक शर्ट विनायक मेटे यांनी घातलेला होता. त्याच्या शर्टाच्या खिशाला भारताचा झेंडा तिरंगाही होता. हनुवटीला आणि चेहऱ्याच्या मोठी जखम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू होते. मात्र, काळाने घात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com