माफीनाम्याच्या पत्रावर शेलारांकडून सावरकरांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashish shelar savarkar shivaji maharaj

माफीनाम्याच्या पत्रावर शेलारांकडून सावरकरांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी; म्हणाले...

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यात आता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राची थेट शिवाजी महाराजांच्या अफजल खान भेटीशी तुलना केली. (Ashish Shelar news in Marathi)

हेही वाचा: Bharat Jodo Yatra: आमची यात्रा रोखून दाखवा; राहुल गांधीचं विरोधकांना आव्हान

आशिष शेलार यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. शेलार पुढं म्हणाले की, राहुल गांधी यांनी नेहरूजींना वाचलं नाही. इंदिराजींचा अभ्यास केला नाही. केरळमधून निवडून आल्यानंतर केवळ हिरव्या झेंड्याचा अभ्यास केलेला दिसत आहे. राहुल यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. तसेच उद्धव ठाकरे यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, अशी आमची अपेक्षा होती. मात्र सत्तेसाठी माती खाल्ली, असंही शेलार म्हणाले.

केवळ मी आणि माझा पक्ष तसेच पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी उद्धव यांनी आपल्या वडिलांच्या विचारांना तिलांजली दिली. तुम्ही अशी बोटचेपी भूमिका का घेतली, असा सवालही शेलार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

उद्धवजींना विनंती आहे की, त्यांनी अभ्यास करावा. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळातील वर्गांमध्ये महात्मा गांधींनी भेट दिली होती. या भेटीत संघ स्वयंसेवकांनी सेवा दिली होती. शिवाय महात्मा गांधींच्या विदर्भ भेटीतही स्वयंसेवकांनी सेवाकार्य केलं होतं, असंही शेलार यांनी म्हटलं.

हेही वाचा: Mantralaya News : सहाव्या मजल्यावरुन उडी; मंत्रालयामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान आशिष शेलार यांनी सावरकर यांच्या माफीच्या पत्राची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली आहे. शेलार म्हणाले की, आपल्याकडे असंख्य महापुरुष आहेत जे दोन पावले मागे येऊन पाच पावले पुढं गेली. शत्रुला अलिंगन देऊन समोरच्यावर हल्ला करणारे आणि मी घाबरलो अस दाखवून समोरच्याचा कोथळा काढणारे असे अनेक महापुरुषांचे दाखले आहेत, असं म्हणत शेलार यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं.