Vidhan Sabha 2019 : तावडे, बावनकुळेंवर दिल्लीकर नाराज 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही श्रेष्ठींच्या नाराजीचा फटका बसला आहे, असे सांगितले जाते. ता

विधानसभा 2019 
मुंबई -  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही श्रेष्ठींच्या नाराजीचा फटका बसला आहे, असे सांगितले जाते. तावडे यांच्यासाठीही फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संयुक्‍तरीत्या प्रयत्न केले होते. दिल्लीकर भाजपनेते ज्यांच्याबद्दल मनात किंतु ठेवतात, त्याला उमेदवारी मिळत नाही, हे स्पष्ट झाले असून, तो मुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांना मिळालेला निवडणूकपूर्व संदेश मानला जातो आहे. माजी विरोधी पक्षनेत्याची उमेदवारी रद्द होणे, हे पक्षात अपवादात्मकपणे घडले असावे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ऊर्जाप्रकल्पाबाबत बावनकुळे यांचे वागणे पक्षश्रेष्ठींना आवडले नव्हते. शिवाय, हा नितीन गडकरी यांना दिलेला संदेश मानला जातो आहे. फडणवीस यांनीही आपली ताकद बावनकुळेंच्या पाठीशी उभी केली तरी त्याचा उपयोग झाला नाही. तावडे यांना प्रथमपासूनच मंत्रिमंडळात घेण्यास दिल्लीचा विरोध होता. त्यांचे योगदान लक्षात घेता पाच वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी टाकलेला शब्द मान्य केला गेला; पण त्यानंतर त्यांची कामगिरी न सुधारल्याने आता विनंती कामी आली नाही. प्रकाश महेता यांची उमेदवारी रद्द होणार हे गृहीत धरण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinod tawde chandrashekhar bawankule