कला आश्रीत नसावी! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्य नगरी, डोंबिवली - कला ही राजाश्रित असता कामा नये, ती राजपुरस्कृत करण्याचे काम आमचे सरकार करील, असे म्हणत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी 27 फेब्रुवारीला मराठी भाषादिनी प्रत्येकाने एक पान विकिपिडियावर मराठीत लिहावे. इंटरनेटवर लाखो मराठी पाने दिसली पाहिजेत, असे आवाहन केले. त्यातून मराठी भाषेचे वेगळे स्थान निर्माण होईल, असे ते म्हणाले. 

डोंबिवलीतील 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. टागोरांना नोबेल मिळाले त्याला डब्लू. बी. ईट्‌स या कवीची प्रस्तावना हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण होते. सरकारही अनुवादाचे उपक्रम राबवणार आहे. याविषयी मार्चमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांनी प्रत्येक महाविद्यालयात गेले पाहिजे. तेथील युवकांशी संवाद साधला पाहिजे. यासाठी लागणारी व्यवस्था सरकार करील, असे आश्‍वासन त्यांनी दिले. येत्या मराठी दिनाला बदलापूरमधील शामराव जोशी यांना भाषासंवर्धन पुरस्कार आणि यास्मीन शेख यांना भाषा अभ्यासक पुरस्कार गेट-वे-ऑफ-इंडियावर मोठ्या दिमाखात देण्याची घोषणात त्यांनी केली. 

नोटाबंदीच्या काळातही लक्ष्मी आणि सरस्वतीच्या दंद्वामध्ये सरस्वतीला या संमेलनाच्या आयोजकांनी विजयी करून दाखवले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. "आगरी भवन' उभारण्यासाठी डोंबिवली येथे भूखंड मिळविण्याचा आपण नक्की प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

पुस्तकांच्या गावाला जा... 
वाईजवळ भिलार या गावी सरकार "पुस्तकांचे गाव' उभारत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चहा कॉफी पित तेथे शांतपणे पुस्तके वाचता येतील. वाचनसंस्कृती पर्यटनाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दोन कोटी पुस्तकांचे वाटप करण्याचा उपक्रम सरकारने यशस्वी केल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली. 

Web Title: vinod tawde in dombivli