जुही चावलाने अलिबागमध्ये विकत घेतली जमीन, किंमत ऐकून विस्फारतील डोळे | Juhi chawla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

juhi chawala

जुही चावलाने अलिबागमध्ये विकत घेतली जमीन, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

अलिबाग: सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खानसाठी (Aryan khan) सत्र न्यायालयात १ लाख रुपयांच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केल्यामुळे अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) चर्चेत आली होती. तीच जुही आता जमीन खरेदीमुळे (Land puchase) चर्चेत आहे. जुहीने अलिबागमध्ये १.८९ कोटी रुपये खर्चून जमीन विकत घेतली आहे. झॅपकी डॉट कॉमच्या हवाल्याने मनी कंट्रोलने हे वृत्त दिलं आहे. मापगावला .३०६० हेक्टर्स (०.७५ एकर्स) मध्ये ही जमीन पसरली आहे. तिने या व्यवहारासाठी ११.३४ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.

२२ ऑक्टोबरला या व्यवहाराच्या कागदपत्रांची नोंदणी झाली. जुही चावलाने या व्यवहारावर काहीही माहिती दिलेली नाही. सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा नवरा रणवीर सिंहने अलिबागमध्ये २२ कोटी रुपये मोजून सेकंड होम विकत घेतले आहे. द एव्हरस्टोन ग्रुपचे राजेश जग्गी यांच्या मालकीचा हा बंगला होता.

हेही वाचा: राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

अलिबागमध्ये आणखी एक रिअल इस्टेटचा मोठा व्यवहार झाला आहे. अलिबाग हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. समुद्रकिनारे, नारळीच्या बागांनी समृद्ध असलेल्या अलिबागला वीकेंडला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पत्नी श्रीकांतादेवी दमानी यांनी आवासमध्ये घर विकत घेतलं आहे.

हेही वाचा: मुस्लीम समाजाच्या मोर्चाला अमरावती, मालेगावमध्ये हिंसक वळण

अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या सहा एकरमध्ये पसरलेल्या एका घराची तब्बल ८० कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या भागातील रिअल इस्टेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असण्याची शक्यता आहे.

loading image
go to top