व्हायरल 'अ'सत्य | लग्न जुळवण्याचा हायटेक फंडा पडू शकतो महागात

मंगळवार, 31 जुलै 2018

लग्न जुळवण्यासाठी सध्या चक्क सोशल मीडियाचा वापर केला जातोय. वर-वधूची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर जाहिर केली जातेय. पण, वधूंची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणं धोकादायक असल्याचा दावा केला जातोय. तशा आशयाचा मेसेज व्हायरल केला जातोय.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. आपल्याला चांगली पत्नी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळं मोठमोठे मेळावेही भरवले जातात. इच्छूक वधू-वर त्या ठिकाणी येऊन लग्न जुळवतात. पण, आता लग्न जुळवण्यासाठी हायटेक फंडा वापरण्यात आलाय. मात्र, हाच हायटेक फंडा महागात पडू शकतो .तुमची वैयक्तिक डिटेल्स कुणीही चोरी करू शकतो. 

लग्न जुळवण्यासाठी सध्या चक्क सोशल मीडियाचा वापर केला जातोय. वर-वधूची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर जाहिर केली जातेय. पण, वधूंची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर व्हायरल करणं धोकादायक असल्याचा दावा केला जातोय. तशा आशयाचा मेसेज व्हायरल केला जातोय.

व्हायरल मेसेज
सावधान ! सोशल मीडियावर वर-वधूचे फोटो व्हायरल करून वैयक्तिक माहिती देऊ नका. त्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.

हा मेसेज व्हायरल करून त्यासोबत काही युट्यूब लिंकही व्हायरल होत आहेत. या लिंकवर वर-वधूची वैयक्तिक माहिती, फोन नंबरही आहे. युट्यूबवर व्हिडीओ टाकल्यामुळं जगभरात कोणीही तो पाहू शकतो. त्यात फोटो आणि फोन नंबर असल्यामुळं ते कोणीही चोरू शकतं. व्हिडीओ कुणी पाहिलाय आणि आपली माहिती कुणी चोरलीय हे कळणारही नाही आणि त्याचा सर्रास गैरवापर होऊ शकतो असाही दावा करण्यात आलाय.

आपण चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. पण, काही समाजकंटक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळं आपण काय काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारे कुणीही आपली वैयक्तिक माहिती चोरू शकतं का...? हे जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. आमचे प्रतिनिधी लोकेश माळी हे सायबर एक्सपर्ट ऍडव्होकेट उर्जिता गोखले यांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज आणि व्हिडीओ दाखवला आणि याचा गैरवापर कसा होऊ शकतो हे जाणून घेतलं.

सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून वैयक्तिक माहिती टाकणं हे योग्य नसल्याचं स्पष्ट झालं. पण, काय काळजी घेतली पाहिजे हेदेखील आम्ही जाणून घेतलं. त्यामुळं आमच्या पडताळणीत लग्न जुळवण्याचा हायटेक फंडा महागात पडू शकतो हा दावा सत्य ठरला. आपण, चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करतो. मात्र, काही वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती याचा गैरवापर करून कुणालाही त्रास देऊ शकतात. लग्न जुळवण्यासाठी हा हायटेक फंडा जरी चांगला असला तरी त्यावर वैयक्तिक माहिती टाकू नका. एवढी मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे.

Web Title: viral satya misuse of personal information on social media