Viral Video : मुख्यमंत्री ते आजोबा, एकनाथ शिंदेंनी वेळ मिळताच भूमिका बदलली; नातवामागे पळापळ | Viral Video Cm Eknath Shinde Playing with his grand son rudransh Shrikant Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde
Viral Video : मुख्यमंत्री ते आजोबा, एकनाथ शिंदेंनी वेळ मिळताच भूमिका बदलली; नातवामागे पळापळ

Viral Video : मुख्यमंत्री ते आजोबा, एकनाथ शिंदेंनी वेळ मिळताच भूमिका बदलली; नातवामागे पळापळ

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या इतकीच त्यांच्या नातवाचीही नेहमी चर्चा होत असते. खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुलगा रुद्रांश याच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे अगदी लहान होऊन खेळताना, त्याचे हट्ट पुरवताना दिसतात. आताही त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री शिंदे आपला नातू रुद्रांशसोबत खेळताना दिसत आहेत. रुद्रांश खेळण्यातली छोटी गाडी चालवत आहे आणि शिंदे त्याच्या मागे पळताना, त्याच्यावर लक्ष ठेवताना दिसत आहेत.

यापूर्वीही एकनाथ शिंदे यांचा रुद्रांशसोबत होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे रुद्रांशसोबत ठाण्यातल्या एका कार्यक्रमात गेले होते. तिथे रुद्रांशचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी एका छोट्याश्या टपरीतून खाऊही घेऊन दिला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याही वेळी त्या समारंभाला रुद्रांशची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला होता. शपथ घेताच मुख्यमंत्री शिंदे यांनी रुद्रांशकडे धाव घेत त्याला कडेवर घेतलं होतं.