मुंबईत एका धावत्या टॅक्सीत महाविद्यालयीन तरुणीसमोर हस्तमैथून करणा-या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे तरुणीला मानसिक धक्का बसला असून तिच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला. सध्या ती उपचार घेत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.