#ViralSatya | ATM मधून चोरी होतो तुमचा पिन नंबर?

मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

एटीएम मशीन वर एटीएम कार्ड स्कॅनर आणि छुपा कॅमेरा लावून तुमच्या कार्डवरील माहिती आणि पिन चोरी केला जातोय असं दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हवे तेव्हा पैसे काढण्यासाठी आपण एटीएम कार्ड वापरतो. खिशातील पैसे संपले की एटीएम मशीन मधून कॅश काढतो. परंतू आपण पैसे काढत असलेले एटीएम मशीन सुरक्षित आहे का? याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

एटीएम मशीन वर एटीएम कार्ड स्कॅनर आणि छुपा कॅमेरा लावून तुमच्या कार्डवरील माहिती आणि पिन चोरी केला जातोय असं दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एटीएम मशीनवर आपल्याला लवकर समजणार देखील नाही अशा प्रकारे हे कार्ड स्कॅनर आणि कॅमेरा बसवला जातो. स्कॅनरद्वारे कार्डवरील माहिती कॉपी केली जाते तर कॅमेऱ्याद्वारे आपला एटीएम पिन मिळवला जातो. एकदा का ही माहिती मिळाली की एटीएम कार्ड मधून आपल्या परवानगी शिवाय पैसे काढणे शक्य होऊन जाते. 

अशा प्रकारे एटीएम कार्डची माहिती चोरुन गैरव्यवहार करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे एटीएम मधून पैसे काढताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 

काय खबरदारी घ्याल?
- एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातो तेव्हा आपल्यामागे कोणी उभं नाही याची खबरदारी घ्यावी
- एटीएम मशीनवर बाहेरच्या काही गोष्टी लावण्यात आलेल्या आहेत का हे तपासावे
- मशीनवर कॅमेरा लावण्यात आलेला आहे का हे तपासून घ्यावे
- आपलं एटीएम कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या हातात देऊ नका
- आपल्या एटीएम कार्डचा पिन अनोळखी व्यक्तीला सांगू नका

Web Title: viral video scanner and camera on ATM machine