वीरेंद्रसिंह तावडे मुख्य सूत्रधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी सचिन अंदुरे याला महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याबाबत सीबीआय कसून तपास करीत आहे. अंदुरेचे हे ‘कर्नाटक कनेक्‍शन’ दाभोलकरांच्या हत्येच्या मूळ कटापर्यंत घेऊन जाणारे आहे, असे सीबीआयच्या वकिलांनी रविवारी न्यायालयाला सांगितले. तसेच वीरेंद्रसिंह तावडे हा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

आज दुपारी कडेकोट बंदोबस्तात अंदुरेला न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवाद करताना सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे म्हणाले, ‘‘अंदुरेला महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिल्याने, या प्रशिक्षणाचे आयोजन नेमके कोण करीत होते? पैसा व साधने यांचा पुरवठा कोण करीत होते, याबाबत सखोल तपास करायचा आहे. विविध ठिकाणांबाबत अंदुरेकडून माहिती घ्यायची आहे. तसेच, कटात वापरलेली दुचाकी व शस्त्रे मिळवण्यासाठी त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असे न्यायालयाला सांगितले. 

वीरेंद्रसिंह तावडे हा कटाचा मुख्य सूत्रधार असून, त्याचा व अंदुरेच्या संपर्काबाबत, या कटासाठी किती मिटिंग्ज घेतल्या. त्या कधी व कोणत्या ठिकाणी पार पडल्या, हत्येच्या कटात सामील असू शकणारे इतर आरोपी आदी बाबींचा तपास सुरू असल्याचे सीबीआय तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपीचे वकील ॲड. प्रकाश सालसिंगीकर यांनी युक्तिवाद करताना, ‘‘अंधुरेबाबतची ही ‘थिअरी’ सीबीआयने नव्याने बनवली असून, याआधी तपासात त्यांनी सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावे घेऊन त्यांना फरार घोषित केले आहे. मारेकऱ्यांची रेखाचित्रे म्हणून अकोलकर व पवारची नावे घेण्यात आली. मात्र, आरोपपत्रामध्ये त्यांची नावे नाहीत. यावरून सीबीआयच्या दाव्यात विसंगती असल्याचे स्पष्ट होते,’’ असे सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये आरोपीने शस्त्र प्रशिक्षण घेतल्याने आता अंदुरेचे कर्नाटक कनेक्‍शन तपासाला आणखी दिशा देणारे ठरत आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. तसेच, अंदुरेचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचेही उघड झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

सारंग अकोलकर आणि विनय पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये नसली, तरी रेखाचित्रामध्ये तयार झालेले चेहरे हे अकोलकर आणि पवार यांच्या चेहऱ्यासारखे दिसतात, हेच दोघे मारेकरी आहेत, असा सीबीआयचा दावा नसला, तरी कटातील त्यांच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे.
-सीबीआयचे  वकील

Web Title: Virendra Singh Tawde mastermind