अधिकात विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात 27 लाखांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पंढरपूर - नुकत्याच संपलेल्या अधिक मासात श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला 2 कोटी 32 लाख 51 हजार 924 रुपये उत्पन्न मिळाले आहे. गेल्या अधिक महिन्यापेक्षा या वेळी मंदिर समितीला तब्बल 27 लाख रुपये जादा उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी 154 ग्रॅम सोने, तसेच 4 किलो 805 ग्रॅम चांदीदेखील अर्पण केली आहे. 16 मे 2018 ते 13 जून 2018 या कालावधीत अधिक महिना पार पडला. या महिनाभरात सुमारे 6 लाख 95 हजार भाविकांनी पदस्पर्श, तर 9 लाख 75 हजार भाविकांनी श्री विठ्ठल रुक्‍मिणीचे मुखदर्शन घेतले. श्री विठ्ठलाच्या पायावर 34 लाख 73 हजार 851 रुपये; तर रुक्‍मिणी मातेच्या पायावर 9 लाख 63 हजार 507 रुपये जमा झाले. मागील तीन वर्षांपूर्वीच्या अधिक महिन्यात समितीला 2 कोटी 5 लाख 37 हजार 751 रुपये उत्पन्न मिळाले होते.

असे मिळाले उत्पन्न (आकडे रुपयांत)
अन्नछत्र देणगी - 1,69,747
पावतीद्वारे उत्पन्न- 66,23,873
बुंदी प्रसाद लाडू विक्री- 32,5,740
राजगिरा लाडू विक्री- 3, 78,900
तसबिरी विक्री- 62,200
भक्त निवास भाडे - 12 लाख 285
नित्यपूजा - 4 लाख
चंदन उटी पूजा - 2 लाख 40 हजार
हुंडी पेट्या, दक्षिणा पेट्या- 2,32,51 हजार 924

Web Title: vittal temple income 27 lakh increase