esakal | विठुरायाच्या महापूजेसाठी 'यांना' मिळाला वारकरी प्रतिनिधीचा मान
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal_20Rukmini_.jpg

आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मानाचा वारकरी ठरला असून मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे यांना मुख्यमंत्र्यांसोबत शासकिय महापुजेसाठी बसण्याचा मान मिळाला.

विठुरायाच्या महापूजेसाठी 'यांना' मिळाला वारकरी प्रतिनिधीचा मान

sakal_logo
By
विलास काटे

Wari 2020 आळंदी (पुणे) : आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी मानाचा वारकरी ठरला असून मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे यांना मुख्यमंत्र्यांसोबत शासकिय महापुजेसाठी बसण्याचा मान मिळाला. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर बंद केल्याने पहारा देणा-या सहा वारक-यांपैकी एकाची निवड चिठ्ठीद्वारे ड्रॉ करून करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे पायी वारी राज्य शासनाने रद्द केली. परिणामी लाखोंची गर्दी नाही आणि दर्शनासाठीची भली मोठी रांगही नाही. तासन् तास ताटळकणारा भाविक यंदाच्या वर्षी रांगेत नसणार आहे. मात्र, श्री विठ्ठल मंदिरात परंपरेने होणारी आषाढी एकादशीची (ता. १) पहाटे सव्वा दोनची महापूजा मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दरवर्षी दर्शनाच्या रांगेतील वारकरी शासकिय महापूजेसाठी निवडला जातो. मात्र, यंदा वारीच रद्द झाल्याने मानाचा वारकरी कोण याकडे लक्ष लागले होते. त्यातच श्री विठ्ठलाचे मंदिरही दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात चोविस तास पहारा देणा-या सहा विणेक-यांची नावे लिहून चिठ्ठ्या केल्या.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

या चिठ्ट्यांमधे विणेकरी बढे यांना शासकिय महापुजेसाठी मानाचा वारकरी म्हणून मंदिर समितीने घेतलेल्या बैठकीत संधी मिळाली. यावेळी बैठकीस मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर जळगावकर महाराज, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. दरम्यान, विठ्ठल बढे मंदिरात विणेची सेवा करतात. नगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ येथील रहिवासी असून ते चौ-याऐंशी वर्षांचे आहेत.

StartupStory: सोशल डिस्टन्सिंगसाठी तरुणानं डोकं लढवलं; तुम्हीही कराल कौतुक

घरात वारीची परंपरा असून सर्वच सदस्य माळकरी आहेत. गेली पाच ते सहा वर्षे बढे विठ्ठल मंदिरात पहारा देण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात तर मंदिराबाहेर न जाता पूर्ण वेळ पहारा दिला. एकंदर पूर्ण वेळ पहारा दिल्यानेच त्यांना विठ्ठलाची कृपाप्रसाद मिळाला. दरम्यान, संबंधित बढे यांची कोरोना चाचणी केली असून निगेटीव्ह असल्याची माहिती मंदिर समितीच्या  सदस्य अॅड. माधवी निगडे यांनी दिली.