

voter
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २७१ तर ११ पंचायत समित्यांमधील १३६ गणांसाठी ४८५ उमेदवार आहेत. मतदान केंद्रांवरील एका बॅलेट मशिनवर १२ उमेदवारांची नावे, चिन्ह असतील. त्यात पहिल्यांदा पांढऱ्या रंगातील नावे जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची आणि त्याखाली गुलाबी रंगातील उमेदवार पंचायत समितीचे असणार आहेत. प्रत्येक मतदारास जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उभारलेल्या पसंतीच्या उमेदवारास प्रत्येकी एक मत द्यायचे आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर गावागावांतील मतदार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदारास दोन मते द्यावी लागतील. मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या यंत्रणेमार्फत बॅलेट मशिनसंदर्भातील माहिती मतदारांपर्यंत पोचवीत आहेत. तहसीलदारांनी मतदान कसे करायचे, एकाच मशिनवरील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार कसे ओळखावे, याचे स्टेट्स ठेवले आहे.
बॅलेटवर जिल्हा परिषद गटाची मतपत्रिका पांढऱ्या रंगात असेल, त्यावर मतदाराच्या जिल्हा परिषद गटातील उमेदवारांची नावे, चिन्हे असतील. दुसरीकडे त्याच मशिनवर पंचायत समितीची मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. त्यावर मतदाराच्या पंचायत समिती गणातील उमेदवारांची नावे व चिन्हे असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक मतदाराला टाकावी लागणार दोन मते
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. एकाच बॅलेट मशिनवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या उमेदवारांची नावे व चिन्हे असणार आहेत. प्रत्येक मतदाराला दोन मते (एक पंचायत समिती व एक जिल्हा परिषदेचा उमेदवार) द्यावी लागणार आहेत.
- सचिन मुळीक, तहसीलदार, मोहोळ
... तर बाकीचे उमेदवार दुसऱ्या बॅलेटवर
एका बॅलेट मशिनवर १२ उमदेवारांची नावे, चिन्हे बसतात. जिल्हा परिषदेच्या एका गटात व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या गणातील उमेदवार १२ पेक्षा जास्त असतील तर १२ च्या पुढील पंचायत समितीचे उमेदवार दुसऱ्या मशिनवर असतील. मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव व चिन्ह शोधून दोन्ही उमेदवारास प्रत्येकी एक-एक मत टाकायचे आहे. उमेदवाराच्या नावापुढे चिन्ह आणि त्यापुढे बटण असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.