पालघर, भंडारा-गोंदियासाठी आज मतदान 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 मे 2018

मुंबई - केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत होण्याचा शिक्‍का भाजप सोमवारी (ता. 28) होणाऱ्या भंडारा-गोंदिया, पालघर निवडणुकीत पुसणार का, असा सवाल राजकीय निरीक्षक करीत आहेत. 

उत्तर प्रदेशातील फुलपूर, सहारनपूर, बिहारमधील अरिहार, राजस्थानमधील अजमेर, जयपूर, मध्य प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होतो, हे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. भंडारा-गोंदियात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने, तर पालघरमध्ये चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. पालघरच्या प्रचारात शिवसेना आणि भाजप सत्तेत राहून एकमेकांवर तुटून पडले होते. 

Web Title: voting for Palghar Bhandara-Gondiya today